नमस्कार मित्रहो…..
कॉलेजच्या दिवसांत पेपर-मासिकांत लिहिलेल्या कविता सोडल्यास मी कधी माझ लेखन सार्वजनीक करायची तसदी घेतली नव्हती. ज्याला आपण करीअर वैगरे म्हणतो त्यात गढल्यामुळे अन हाती आलेली काम आवडत गेल्यामुळे असावं पण त्यातच सगळा वेळ जात गेला. आता सगळ अस सार्वजनीक करायच कारण ठरल “मायबोली”- तिथल्या मनमुराद प्रतिसादांमुळे पुन्हा नव्या दमानं लिहायचा हुरुप आला. त्यातनच मग आली ब्लॉगची आयडीया. मैत्रेय हे मला नेहेमीच भावलेल नामाभिदान..अन म्हणुन तेच नाव ब्लॉगला द्यायच ठरवल!!!
माझ्याबद्दल सांगायच तर तस बरच आहे. वडनेर ते व्हेनीस असा हा प्रवास आहे( वडनेर हे माझ बालपण गेलेल गाव..). मी करीअरची सुरुवात सरकारी अधिकारी म्हणून केलेली पण तिथे रमलो नाही. मग जे व्यवस्थापनाच शिक्षण सगळ्यात आवडल होत त्याच्या मदतीन खासगी क्षेत्रात काही नोकर्या केल्यात अन अजुनही करतोच आहे. जनरल मोटर्स ते अगदी आपल्या SBI मध्येही काम केल अन मजल-दरमजल करत सध्या हाँग़काँगला असतो. हाडानं अजुनही “एक स्मॉल टाऊन बॉय” आहे. एका छोटयाशा गावातल समृध्द बालपण. आई-वडलांच अपार प्रेम मिळालेल..शाळेतल्या शि़क्षणापेक्षा जीवनातल शिक्षण जास्त उपयोगी पडलेलं…!!! आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींवर प्रेम आहे…आईवर खूप होत..देवावर मात्र बिल्कुल नाही. फुल लेन्ग्थ जीवन जगायला आवडत …..जिन्दगी जिन्दादिली का नाम है – यावर अपार विश्वास आहेच…..!!!!!
मी आयुष्यात जे पाहीलं-दिसलं, दिलं-घेतलं, सोडलं-सांडलं, भावलं-जपलं त्यासगळ्यावर कविता लिहीण पसंत करतो. त्यामुळे काही कवितांत अतिशय वैयक्तीक संदर्भ येणे हे अपरीहार्यच आहे.कविता ही माझ्यासाठी आयुष्यातल्या व्यक्त-अव्यक्ताच्या मधली कुठलीतरी जागा आहे.त्यामुळे एका जाणीवांच्या गुलामासारख मी कविता लिहुन ही जागा भरत-जपत असतो.
शेवटचं पण महत्वाच : हा ब्लॉग माझे मायबोलीकर मित्र विशाल कुळकर्णी यांच्याविना तयार झालाच नसता त्यामुळे त्यांचे मनःपुर्वक आभार!!! तसेच ज्यामुळे मी लिखाण हिरीरीने सार्वजनीक करायला लागलो अन ज्यांनी पहिल्याच महीन्यात “सर्वोत्तम कवितेचा मान” देऊन मला उत्साह दिला त्या “मायबोली”चे व तिथल्या सगळ्या मित्रांचेही हार्दीक आभार!!! अन सरतेशेवटी माझ्या आयुष्यांत आलेल्या-भावलेल्या अन काही निसटलेल्याही लाडक्यांचे यायोगे आभार…माझी कविता फुलली ती या सगळ्यांमुळेच !!!!
हा ब्लॉग आपल्याला आवडावा… काही क्षण चांगला निवांत विरंगुळा आपल्याला मिळावा हा उद्देश – तो सफल झालेला पहायला आवडेल ..!!!!
लोभ असावा अन तो वृद्धींगतच व्हावा हा आग्रह !!!
सस्नेह,
गिरीश कुळकर्णी
” मैत्रेय “


chaanach ahe ………thx mail baddal ani ya bolg sangitala tyabaddal………..
Tuza Blog khupach Sundar aahe. Punha bhet dyayala nakkich avadel.. Naav Chaan diley !!
Good luck
ethe aapaN marahit pratisad deu shakat naahi ka soiche zhaale asat .
ethe aapaN marathit pratisad deu shakat naahi ka soiche zhaale asat .
ethe aapan marathit pratisad deu shakat naahi ka soiche zhale asat .
Liked your blog.
bapu karandikar
ekdam mast…khup chaan vaatala…
Good! Keep writing!
गिरीषदा,
मस्तच झालाय , लिहीत राहा !
सस्नेह,
विशाल
abinandan Girish
aaNi blogvishwat swagat.
khup khup lihiNyaasaThi khup khup shubhechchaa!
blog mast jhaalaa aahe.
ek navin kavita lihili ahe …nakki vacha vel milala ki thanx..
प्रिय गिरिष,
‘मायबोलि’वर ‘मैत्रेय’ हे नाव वाचुन, आपल्या ‘ब्लॉग’ला ‘आगंतुक’ पणे भेट दिली…
‘मैत्रेय’ या नावाशी माझं एक वेगळंच नातं आहे. माझा मित्र – कै. मधुसुदन सत्पाळकर, याने ‘मैत्रेय फाउंडेशन’ या नावाने ‘आदिवासी’ लोकांसाठि काम करणारी ‘सेवाभावि संस्था’ सुरु केली. त्याच्या अकाली, अनपेक्षीत दुख:द निधना नंतर, आज या संस्थेचा व्याप त्याचि पत्नी (माझी परमप्रीय मैत्रीण आणि विद्यार्थीनी) – श्रीमती वर्षा सत्पाळकर सांभाळते आहे. त्या संदर्भाने मी आपल्या ‘ब्लॉग’ला भेट दिली…
‘कविता’ हा विषय शाळेत १२वि पर्यंत शिकलो तेव्हढाच. पुढे या विषयाशी कधीही ‘नाळ’ जुळलिच नाही. त्यामुळे ‘त्या’ प्रांतातलं आपल्याला काहीही कळत नाही, याची पुरेपूर जाणीव ठेवुन फक्त ‘डोळ्या खालुन घालणे’ एवढेच ‘कविता वाचन’ करतो. बाकी ईतर वाचन ‘अफाट’ आहे. ‘मायबोली’वर ‘मालवणी’ भाषेतुन ‘जमेल तसे’ लिखाण चालु असते…
kindly see the tributal poem for 26/11 today or tommorrw… at my blog if u get time
and come back again and again to c that’
fine…@ http://www.akhiljoshi.wordpress.com
thanx
blog chhan jhaalay, Girish
very nice blog. haappy to find u.
Dear Gireeshjee,
Aaplaa blog vaachnyaas usheer jhaalyaabaddal pratham kshamasva.
Mi aajparyant aaplyaa kavitaach vaachlyaa – maaybolivar. Maaybolivar gelo kee konee parkaa, anolakhee vaatatach naahi. Tumchi kaay kinvaa itar konaachee kaay, kavitaa vaachalee kee vaataata – aapan sagale kuthetari aagodar bhaetalo asanaar… smarat naahi evadhach!
Aaplyaa kavitaanmadhye sachchepanaa jaanavalaa. Aapan blog madhye lihilelyaa ‘prabodhan’ vishayak vaakyaachi garajach navhatee asa vaatata. Maajhyaa pramaanech anekaannaa aaplee kavitaa bhaavte, manaalaa bhidate. Yaatoonach honaaree jaaneevach sagala saangoon jaate – kavibaddal!
Aaplee praathamik mahiti vaachun aaplee olakh adhik gahiree jhaalee. Tumchyaa kavitaanvar prem aahech, pan tumche gadya lekhanahee vaachaaylaa aavdel…
Aaplyaatlaa “small town boy” asaach jaagaa raaho – jenekaroon aapan aaplyaabarobarach aamchyaasaarkhyaanchyaa sanvedanaa jivant thevu shakaal!!!
Khoop lihala… Aapnaas mana:poorvak shubhechchaa!
-Prady
Dear Girish,
Today I visited your blog. Congrats. As you know, I have been your one of the oldest companions since college days and a sincere listener & a critic of your literary work. Your poems are realy soul searching and enjoyable. You used to compose good marathi gazals also. Hope in near future I hear something about your gazals also.
With love,
Parag
please let me know if you received my comment about your blog…
Blog aavadala. mastach ahe.
नमस्कार,
तुमचा ब्लॉग उत्तम जमलाय. तुमचे कवितेबद्दलचे चिंतन… ‘कविता ही माझ्यासाठी आयुष्यातल्या व्यक्त-अव्यक्ताच्या मधली कुठलीतरी जागा आहे.’ खूपच सुंदर आहे. लिहित राहा. लेखनासाठी शुभेच्छा…
- अभिराम
तुमचा ब्लॉग छान आहे. शिवाय ते शेवटी असलेलं चित्र कोणी हाताने काढलं आहे का? खूप छान आहे.
Girish ji…tumchya aankhi katha vachayala mala khup aawadtil…
वडनेर ते व्हेनीस असा हा प्रवास आहे.
क्या बात है..!!
तुमचा ब्लॉग आवडला..!!!
मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
राजे, कुठे आहात? दुबईला जावून विसरलात की काय आम्हाला?
Girish saheb,
Aaj mi ani khanvilkar milun aapla blog pahila vachla, khanvilkarani kamala survaat keli aahe.
Blog var taklel sundar painting amhi pahil.
Arvind
प्रोफाईल नावाची कथा मायबोली वर वाचली . मी मुंबईत अनुराधा दिवाळी मासिक व धर्मभास्कर मासिकाचा डीसायनर आहे.
ही कथा जर अनुराधा दिवाळी मासिकाच्या संपादकाना आवडली तर ती प्रकाशित करण्याची परवानगी द्याल का.